संपादकीय शाहू जयंतीच्या निमित्ताने हा पहिला अंक आपल्या हाती सुपूर्द करताना अतिशय आनंद होत आहे. असा दुर्मिळ योग योगायोगानेच पदरात पडावा यासारखे सुदैव नाही. या निमित्ताने आजच्या या अंकात जास्तीत जास्त सामाजिक विषयावर लेखन घेतले आहे. यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख सर्वांनी आवर्जून वाचवा. शाहू राजांचे आयुष्य तरुणांना एक आदर्श आहे. सर्व सत्ता, सुखे, संपत्ती असतानासुद्धा एक संयमी व कणखर नेतृत्व उभे करून शाहू राजांनी आदर्श घालून दिला आहे. हे शाहू चरित्र आजच्या उच्छृंकुल तरुणाईला निश्चित मार्गदर्शक आहे. अर्थात, महान राष्ट्रपुरुषांची चरित्रे नेहमीच समाजाला मार्गदर्शक असतात. पण समाजानेही वेळोवेळी त्याचा अभ्यास व उपासना करणे गरजेचे आहे. आजकाल राष्ट्रपुरुष केवळ राजकीय स्वार्थासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा वेळी हा विचार सध्याच्या वाचकांच्यापुढे ठेवणे अतिशय मोलाचे व गरजेचे वाटते. तरुणांना दिशा देवून सक्षम समाज घडवला नाही तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती आहे. आज प्रत्येकजण जाती धर्मात तेढ वाढविण्याच...